कृषी विशेष
🚜🌱 छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन अँग्रोवन अँग्री एक्स्पो २०२६ ला आजपासून सुरुवात..!
शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरणाऱ्या ‘सकाळ ॲग्रोवन कृषी प्रदर्शन २०२६’ चे आयोजन छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात आले आहे.
📅 दिनांक ९ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजन
📍 स्थळ केंब्रिज स्कूल जवळील श्रीराम मंदिर ट्रस्टचे मैदान, छत्रपती संभाजीनगर
या प्रदर्शनात 👉 स्मार्ट शेती, एआय तंत्रज्ञान, ड्रोन, सोलर पंप, तसेच आधुनिक कृषी यंत्रे, बियाणे व खते पाहता येणार आहेत.
राज्य व परराज्यातील नामांकित कंपन्यांचा सहभाग असून, शेतकऱ्यांसाठी नवी तंत्रज्ञानाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व तसेच मराठवाड्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या कृषी प्रदर्शनला भेट देऊन नवनवीन उपाययोजना तंत्रज्ञान वापरून आपल्या शेतीच्या उत्पन्नाचा स्रोत सुधारावा.
🌾 आधुनिक शेतीकडे एक पाऊल पुढे..!

