राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम २०२५ अंतर्गत राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर..!
MahaTej Digital January 13, 2026
0
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम २०२५ अंतर्गत राज्यातील १२ जिल्हा परिषदेच्या व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत.
अनेक वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्यामुळे गावपातळी वरील स्थानिक इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले, असून प्रत्येक इच्छुक कार्यकर्त्याच्या मनात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असेल तसेच यावेळी खूप वर्षांनी पंचायत समितीच्या व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत असल्यामुळे आपल्याला पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी चढाओढ पाहायला मिळणार असेच चित्र सध्या राज्यात दिसून येत आहे, अनेक कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया पुढील प्रमाणे.
• अर्ज दाखल करण्यास सुरुवात - 16 जानेवारी 2026
• अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख - 21 जानेवारी 2026
• अर्जाची छाननी - 22 जानेवारी 2026
• अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - 27 जानेवारी 2026
• मतदान - 05 फेब्रुवारी 2026
• मतमोजणी - 07 फेब्रुवारी 2026
राज्यातील ज्या १२ जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे त्या पुढील प्रमाणे :- रायगड, पुणे, सोलापूर, परभणी, कोल्हापूर, लातूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, धाराशिव